सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असताना दुसरीकडे मास्क व सॅनिटायझरचा वापर करणाऱ्यांची संख्या मात्र घटत चालली आहे. गतवर्षी सॅनिटायरझरची मागणी तब्बल ९० टक्के होती, ती आता २३ टक्क्यांवर आली आहे, तर मास्कची मागणीही काही प्रमाणात कमी झाली आहे.
सातारा जिल्ह्यात २२ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला ोहोता. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत गेली. जुलै, ऑगस्ट महिन्यात तर कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजविला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुुसार नागरिकांकडून मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर केला जाऊ लागला. या दोन्ही वस्तूंना सलग चार ते पाच महिने मोठी मागणी होती. प्रत्येक घरात, तसेच सर्व खासगी व शासकीय कार्यालये, दुकानांत सॅनिटायझर व मास्कचीच चलती होती. मात्र, डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला अन् सॅनिटायझर, मास्कच्या मागणीतही घट झाली.
गतवर्षी सॅनिटायझरला तब्बल ९० टक्के मागणी होती. आता ती २३ टक्क्यांवर आली आहे. मात्र नागरिक मास्कचा दैनंदिन वापर करीत असल्याने मास्कच्या मागणीत केवळ १५ टक्के इतकीच घट झाली आहे.
(चौकट)
तब्बल ६७ टक्के विक्री घटली
१. गतवर्षी सॅनिटायझरला ९० टक्के मागणी होती. यंदा ती ६७ टक्के इतकी घटली आहे.
२. केवळ दुकानदार, शासकीय कार्यालये व बाजारपेठेत सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.
३. नागरिकांकडून हात निर्जंतुक करण्याऐवजी साबणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे घरोघरी सॅनिटायझरचा वावर कमी होऊ लागला आहे.
४. प्रारंभी सॅनिटायझरचे दरही अधिक होते. त्यामुळे ते नियमित खरेदी करणे सर्वसामान्यांना न परवडणारे होते. त्यामुळे नागरिकांमधून साबणाला मागणी वाढली आहे.
(पॉइंटर्स)
मागील वर्षीची विक्री ९० %
यावर्षी सॅनिटायझरची विक्री २३ %
मास्क विक्रीत १५ % झाली घट
(कोट)
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे आम्ही सॅनिटायरझरचा नियमित वापर करीत होतो. इतरांनाही सॅनिटायझर व मास्क वापरण्याबाबत आवाहन करीत होतो. मात्र, सॅनिटायझरचा वापर आम्ही कमी केला असून, आता साबणाचा वापर वाढविला आहे.
- चिन्मय कुलकर्णी, सातारा
(कोट)
आम्ही मास्कचा नियमित वापर करीत आहोत. केवळ बाजारासाठी व इतर कामकाजासाठी घराबाहेर पडल्यानंतर सोबत सॅनिटायझर बाळगतो. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा सॅनिटायझर व मास्कचा वापर गरजेचा बनला आहे.
- शिरीशकुमार अवसरे, सातारा
(कोट)
गतवर्षी सॅनिटायझरला प्रचंड मागणी होती. गेल्या दोन ते तीन महिन्यांत यात मोठी घट झाली आहे. मात्र, मास्कच्या मागणीत फारसा फरक पडला नाही. नागरिकांकडून उच्च प्रतीच्या मास्कला आजही मागणी आहे. निर्जंतुकीकरणासाठी सध्या अनेक जण हॅण्डवॉश व साबण वापरू लागले आहेत.
- राजेश पवार, मेडिकल चालक
फोटो : १७ सचिन डमी
१७ सचिन डमी फोटो