सातारा : संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी साताकरांना थोडी ढिलाई दिल्यानंतर बरेच युवक काहीही काम नसताना रस्त्यावर फिरू लागले. परिणामी संचारबंदी कायद्याचे उल्लंघन होऊ लागले. त्यामुळे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी यावर अनोखा उपाय शोधून बिनकामी फिरणाऱ्या युवकांच्या दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दिवसभर पोलिसांनी २० दुचाकी जप्त केल्या होत्या. संबंधितांना चालत पोलिसांनी घरी पाठविले. जेणेकरून पुन्हा कोणी रस्त्यावर येणार नाही, याची पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन केले असताना व संचारबंदीचा आदेश असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत भगवान कदम (रा.वाढे, ता.सातारा), केतन हरिश्चंद्र जाधव, अजय विश्वास साबळे (दोघे रा. दुदुस्करवाडी, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अशा प्रकारे विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांवर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
CoronaVirus Lockdown : रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 5:58 PM
संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देरस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी जप्ततिघांवर गुन्हे दाखल; १४ दिवस दुचाकी राहणार पोलीस ठाण्यात