शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

कोरोनामुळे कास पर्यटन कासावीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:30 AM

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख ...

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची तोट्याची तलवार चालली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख पर्यटकांनी कासकडे पाठ फिरवल्याने वनव्यवस्थापन समिती, कास पुष्प पठार व्यावसायिक संघटना, हॉटेल चालक-मालक, उपव्यावसायिक, वाहतूक संघ, सातारा हॉटेल व्यावसायिक, कास-बामणोली पर्यटन आणि यांच्यावर आधारित कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यानंतर कास परिसरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. ऐन पावसाळ्यातदेखील वजराई धबधबा, एकीव, घाटाई दर्शन, बामणोली आणि कास परिसरात पर्यटकांची मांदियाळी असते. मागील काही वर्षांत पावसाळी पर्यटनाने हॉटेल व्यवसायाला अगदी सुगीचे दिवस आणले होते. जिल्हा, राज्य, परजिल्हा-राज्यासह विदेशी नागरिकांनासुद्धा कासची आस लागून रेलचेल केल्याचा इतिहास आहे. इथल्या पर्यटनाला अगदी नवीन महाबळेश्वरची चाहूल लागल्यामुळे येथील व्यवसायाला तेजीचे दिवस आले होते. परंतु, मार्च २०२० पासून कोरोनामुळे कास पर्यटन ओस पडले. बघता-बघता दोन वर्षे हातातून निसटून गेली. कास पुष्पपठाराला दरवर्षी दहा-बारा लाख पर्यटक भेट देतात. सातारा शहरात मुक्कामासाठी लॉज मिळणे अवघड होऊन जाते. ‘पुष्प बहार' येण्याअगोदरच सर्व हॉटेल्स ॲडव्हान्स बुकींगनी खचाखच होतात; परंतु आता केवळ हे स्वप्नात वाटणारी गोष्ट ठरते की काय, असे वाटू लागले आहे. परंतु मागील वर्षापासून या व्यावसायिकांची अवस्था पोटाला चिमटा घेऊन जगण्यासारखी झाली आहे.

वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे मोठे हाल झाल्याचे अध्यक्ष बजरंग कदम यांनी सांगितले.

(कोट)

कास रस्त्याशेजारील अनेक गावांना पर्यटनामुळे चार पैसे मिळण्याबरोबरच हाताला काम मिळत होते. मुंबई-पुण्याला पोटासाठी जाणारा लोकांचा लोंढा गावातच रोजगार मिळाल्याने चांगला स्थिरस्थावर झाला होता. परंतु कोरोनाच्या महामारीने बेरोजगारीबरोबरच उपासमारीची वेळ येऊन संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कास पर्यटनावर आधारित असणाऱ्या घटकांना शासनपातळीवर आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

-सोमनाथ जाधव, अध्यक्ष, पठार विभाग भूमिपुत्र संघटना

कोट

मार्चअखेरीस जिल्हा बँकेकडून कृषी पर्यटन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे नुसते व्याज तीन लाख भरले असून, वर्षभरात एवढा व्यवसायही झाला नाही. कर्जाची मुद्दल कधी जाणार व व्यवसाय सुरळीत कधी होणार याची चिंता सतत राहते. शासनाने व बँकांनी काहीतरी मदत करावी.

-अर्चना पवार, सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र, सह्याद्रीनगर

फोटो / कॅप्शन

२८कास

कास पुष्प पठाराची समितीचे कर्मचारी देखभाल करताना पाहायला मिळत आहेत.