रशिद शेखऔंध : कोरोनाच्या प्रलयामुळे सगळ्याच गोष्टीवर परिणाम झाला असून, ग्रामीण भागातील शेतकरीही यातून सुटले नाहीत. दुष्काळी परिस्थितीत मोठ्या कष्टाने हातातोंडाला आलेल्या वांग्याचे पीक कोरोनामुळे जनावरांच्या पुढे खायला घालण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे खर्च केलेले पैसेही निघणार नसल्याने अडचणीत भर पडणार आहे.उन्हाळ्याच्या तोंडावर विक्रीला येतील, अशा नियोजनावर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपल्या शेतात पाण्याच्या बजेटवर थोडे-थोडे तरकारीची लागण करतात. त्याचप्रमाणे खटाव तालुक्यातील अनेक शेतकरी थोडी नगदी उलाढाल होईल, असे प्रयत्न करतात. त्यात निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळी परिस्थिती यावर मात करून मोठ्या जिद्दीने आपली शेती फुलवतात.औंध परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा वांगी, कोथिंबिर, मेथी, कोबी यासह अनेक पिके पिकविली आहेत. आता उन्हाळ्याचा चांगला दर मिळेल, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी कोरोनामुळे तरकारी जनावरांना घालण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मोठ्या जिद्दीने पिकविलेली पिके संचारबंदीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी तोडून जनावरांना टाकत आहेत. शेतकऱ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.
corona in satara-कोरोनामुळे वांगी जनावरांच्या दावणीला, शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:19 PM
कोरोनाच्या प्रलयामुळे सगळ्याच गोष्टीवर परिणाम झाला असून, ग्रामीण भागातील शेतकरीही यातून सुटले नाहीत. दुष्काळी परिस्थितीत मोठ्या कष्टाने हातातोंडाला आलेल्या वांग्याचे पीक कोरोनामुळे जनावरांच्या पुढे खायला घालण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे खर्च केलेले पैसेही निघणार नसल्याने अडचणीत भर पडणार आहे.
ठळक मुद्देकोरोनामुळे वांगी जनावरांच्या दावणीला, शेतकऱ्यांचे नुकसानकोरोनामुळे बाजारही उठल्याने हातातोंडाशी आलेली वांगी जनावरांना