सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी वाई तालुक्यातील आसले येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा तर पाटण तालुक्यातील जांभेकरवाडीमधील ७० वर्षीय महिलेचा आणि माण तालुक्यातील भालवडी येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ५२ जण नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालीय. कोरोना बाधितांचा जिल्ह्याचा आकडा आता ३९४ वर तर बळींची संख्या १२ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. त्यामुळे प्रशासन अक्षरश: हतबल झाले आहे. गत आठ दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला तर ५२ जण कोरोना बाधित आढळून आले.वाई तालुक्यातील असले येथील ६७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती मुंबई वरून प्रवास करून आली होती. या व्यक्तीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. तसेच पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेचाही मृत्यू झाला.
माण तालुक्यातील भालवडीतील ६२ वर्षी व्यक्तीही मुंबईवरून प्रवास करून आली होती. या व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.कोरोना बाधित रुग्णांमध्ये माण तालुक्यातील म्हसवड येथील ४८ वर्षीय पुरुष, तोंडले येथील ५८ वर्षीय पुरुष, भालवडी ६२ वर्षीय पुरुष (मृत्यू), लोधवडे येथील ३४ वर्षीय व २८ वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वांझोली येथील ५२ वर्षीय पुरुष व अंभेरी येथील १४ वर्षीय युवक. सातारा तालुक्यातील खडगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील २१ वर्षी युवक , कुस बुद्रुक ४५ वर्षीय महिला. वाई तालुक्यातील आकोशी येथील ५८ वर्षीय पुरुष, आसले येथील ४० वर्षीय पुरुष, मालदपूर येथील २४ वर्षीय पुरुष, देगाव येथील ५५ वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील २५ वर्षीय पुरुष, धयाट येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
पाटण तालुक्यातील धामणी येथील ३५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय पुरुष जांभेकरवाडी ७० वर्षीय महिला, गमलेवाडी येथील ३१ वर्षीय पुरुष, मन्याचीवाडी येथील २० वर्षीय युवक, मोरगिरी येथील ५७ वर्षीय पुरुष व ७२ वर्षीय महिला, आडदेव येथील ३५ वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील ७२ वर्षीय पुरुष, ८ वर्षीय मुलगा, घाटदरे येथील ४७ वर्षीय महिला, पारगाव येथील २७ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, ५० वर्षीय दोन पुरुष, २५ वर्षीय पुरुष, ७८ वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील सावरी येथील ३९ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, ७ वर्षांची मुलगी, केळघर येथील १६ वर्षीय युवक ४४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील २६ वर्षीय पुरुष व १८ वर्षी युवक, देवळी येथील ९ वर्षाचा मुलगा, ४२ वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील ४२ वर्षीय महिला. कराड तालुक्यातील खराडे येथील ४५ वर्षीय महिला व ५५ वर्षीय पुरुष, म्हासोली येथील २० वर्षीय युवती, फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील २१ वर्षीय महिला अशा ५२ जणांचा समावेश आहे.दरम्यान, ९७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३९४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२६ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २५६ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.