कऱ्हाड : कोरोनाने होणारा प्रत्येक मृत्यू जिवाला चटका लावतोय. गतवर्षी एप्रिल महिन्यात हे मृत्युतांडव सुरू झाले, अद्यापही ते थांबलेले नाही. कधी थांबेल, हेही सांगता येत नाही. अशातच कऱ्हाड तालुक्यात गत बारा महिन्यांमध्ये तब्बल ४५२ बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये व्याधीग्रस्तांची संख्या निम्म्यावर असल्याचे दिसून येत आहे.
कऱ्हाड तालुक्याचा मृत्युदर सध्या २.४१ टक्क्यावर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची सरासरी ३.१७, तर चाचणीच्या तुलनेत १७.३३ टक्क्यावर आहे. कोरोनामुक्तीचा दर ८७.६९ टक्क्यावर असून, १०.८१ टक्के म्हणजेच एकूण २ हजार १४ रुग्ण सध्या उपचारात आहेत. त्यातच कोरोनाशी लढायचं कसं, हा प्रश्न सध्या प्रत्येकाला सतावतोय. या रोगाविषयी सुरुवातीपासूनच मोठी भीती आहे. बदलता स्ट्रेन्थ, बदलती लक्षणे, अनिश्चित उपचारपद्धती यामुळे गोंधळाची स्थिती आहे. अद्यापही हा गोंधळ कमी झालेला नाही. त्यातच मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे भीती कित्येक पटीने वाढली आहे.
गतवर्षी एप्रिल महिन्यात तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने मृतांची संख्या वाढतच गेली. आजअखेर ४५२ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. त्यामध्ये व्याधीग्रस्तांची संख्या जास्त असून महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण दुप्पट आहे.
- चौकट
व्याधीग्रस्त २२९ रुग्ण
मृतांमध्ये व्याधीग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. वयानुसार विचार करता, २१ ते ३० वयोगटातील २ पुरुष व २ महिला, ३१ ते ४० वयोगटातील ४ पुरुष व १ महिला, ४१ ते ५० वयोगटातील १० पुरुष व २ महिला, ५१ ते ६० वयोगटातील ३९ पुरुष व १४ महिला आणि ६० वर्षांवरील वयोगटातील १०२ पुरुष आणि ५३ महिला अशा एकूण २२९ व्याधीग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
- चौकट
महिनानिहाय मृत्यू
२०२०
एप्रिल : २
मे : ३
जून : ३
जुलै : १७
ऑगस्ट : ८१
सप्टेंबर : १६०
ऑक्टोबर : ५८
नोव्हेंबर : ११
डिसेंबर : ३
२०२१
जानेवारी : ०
फेब्रुवारी : ०
मार्च : १३
एप्रिल : ३५
मे : ६६ (दि. १७ पर्यंत)
- चौकट
आरोग्य केंद्रनिहाय मृत्यू
कऱ्हाड : ७३
काले : ७२
वडगाव : ४२
सदाशिवगड : ३८
येवती : ३८
उंब्रज : ३६
सुपने : ३५
रेठरे : ३३
मसूर : ३१
कोळे : २७
इंदोली : १८
हेळगाव : ९
- चौकट
वयानुसार मृतांची संख्या
वय मृत्यू
१-१० : ०
११-२० : २
२१-३० : १२
३१-४० : १८
४१-५० : ४८
५१-६० : १०९
६१ वर : २६३
- चौकट
एकूण मृतांमध्ये...
पुरुष : ३१८
महिला : १३४
- चौकट
चाचणी ते मृत्यूपर्यंतचा कालावधी
२४ तासात : ७१
४८ तासात : ८२
१ ते ५ दिवस : १११
६ ते २१ दिवस : १८६
निदान न झालेले : २
- चौकट
२२३ कोरोना बळी
कऱ्हाड तालुक्यातील एकूण ४५२ मृतांपैकी २२३ रुग्णांचा फक्त कोरोनानेच मृत्यू झाला असून त्यामध्ये २ किशोरवयीन, ८ युवा, ४९ प्रौढ, ५६ ज्येष्ठ आणि १०८ वृद्धांचा समावेश आहे. या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्याधी नव्हत्या.
लोगो : इन डेप्थ स्टोरी