खटाव : कोरोनावर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील कडक निर्बंध असलेल्या गावांनी कंबर कसली आहे. कोरोनाबरोबर आता सर्व बाजूंनी लढा उभारून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी खटावमध्ये कोरोनाची तपासणी व चाचणीसाठी आरोग्य विभागाचे व ग्रामपंचायतीच्या वतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायतीनजीक पारायण मंडप येथे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४५ लोकांची चाचणी करण्यात आली.
यावेळी आरोग्यसेवक योगेश भोसले, रत्नमाला निकम, कृषी अधिकारी अप्पासाहेब गौड, नोडल अधिकारी प्रमोद शेलार, गटप्रवर्तक शीला कुंभार, सुनीता पोळ, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आदी या कॅम्पमध्ये तपासणीसाठी सहकार्य केले.