यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष वैभव चव्हाण, अनिल देसाई, नागरी आरोग्य केंद्राच्या शीतल कुलकर्णी उपस्थित होत्या. पहिल्याच दिवशी १२५ जणांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली.
कऱ्हाड शहरात काही महिन्यांपासून नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने शहरातील प्रशासकीय कार्यालय, बसस्थानक, पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत तसेच कामानिमित्त येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पालिका, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, आदी ठिकाणी चाचणी सुरू आहे. शिवाय शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी व सर्व रिक्षाचालकांचीही चाचणी करण्यात येत आहे. आता शहरातील सर्व रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने लसीकरणही केले जाणार असल्याचे आरोग्य अभियंता आर. डी. भालदार यांनी सांगितले.
मेडिकल असोसिएशनच्या कृष्णा नाका येथील कार्यालयात त्या परिसरातील सर्व रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. या पथकात नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्याधिकारी डॉ. प्रशांत माने, आरोग्य कर्मचारी सोहेल मुल्ला, भरत पंचारिया, अजित कांबळे, प्रसाद कांबळे, भाग्यश्री कोळेकर, वासंती गाडे, सारिका थोरवडे, आरोग्यसेविका संजीवनी सातपुते, मेघना नलवडे, अरुण काळे हे कार्यरत आहेत.
फोटो : ३०केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड येथे मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयात रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.