मसूर : लायन्स क्लब, मसूरच्या सहकार्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मसूर भागातील सर्व डाॅक्टरांसाठी कोविड स्पेशल प्रशिक्षणचे आयोजन केले आहे. त्याचा ग्रामीण रुग्णांना फायदा होणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फ्रंटलाईन फायटर्सची जबाबदारी त्यांच्या मेसेजमधून व्यक्त केली. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
यासाठी भागातील सर्व डाॅक्टर व मेडिकल स्टाफ तसेच पॅरामेडिकल टीम्स उपस्थित होत्या.
लायन्स क्लब, मसूरच्या अध्यक्षा जान्हवी पुरोहित यांनी स्वागत केले. डाॅ. रमेश लोखंडे यांनी आभार मानले.
मसूरचे सरपंच लायन पंकज दीक्षित यांनी ग्रामपंचायत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवत असलेल्या विविध उपक्रमांसंदर्भातील बाबींची माहिती दिली. माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश जाधव, सागर पुरोहित, वैभव शिंदे, संजय जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
फोटो जगन्नाथ कुंभार यांनी पाठविला आहे.
मसूर येथे खासगी डाॅक्टरांसाठी कोरोना प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी डॉ. रमेश लोखंडे, सरपंच पंकज दीक्षित, जान्हवी पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. (छाया : जगन्नाथ कुंभार)