सागर गुजरसातारा : कोरोनाचे वाढते संक्रमण लसीकरणामुळे रोखले गेल्याचे आता सिद्ध झाले आहे. तसेच जरी संसर्ग वाढला तरी लसीकरणामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण टाळेल सर्वांचे मरण असेच म्हणावे लागेल.
लसीकरणाचे फायदे खूप आहेत, जे काही तोटे सांगितले जातात ते अंधश्रद्धेपोटी सांगितले जातात. प्रशासनाकडे लसींची उपलब्धी मोठी आहे. काही महिन्यांपूर्वी प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी झुंबड उडत होती. रात्री-अपरात्री लोक केंद्रावर जावून थांबत होते. पहाटेपर्यंत आपला नंबर कधी येईल याची वाट लोक पाहात होते. परंतु सध्याच्या घडीला लसीकरण केंद्रांवर पाहायला मिळत नाही. दिवसभरात किरकोळ प्रमाणामध्ये लसीकरण होते, हे योग्य नाही. लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर या व्यतिरिक्त दुसरा पर्याय जगात नाही.
सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्हाभरात वीस-तीस पेशंट दिवसभरात सापडतात. म्हणून लोक गैरसमज करून बसले आहेत. अनेक जण तोंडाला मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. हॅन्डवॉश करीत नाहीत. त्यामुळे कोरोनासारखा विषाणू केव्हाही पसरू शकतो. एकाला झाला तर तो हजार लोकांपर्यंत सहज पसरतो, हे आता कळून चुकले आहे. अनेक जण जवळपास सहा हजारांच्या वर लोक कोरोनामुळे दगावले आहेत, तर अडीच लाखांच्या वर लोकांना कोरोनाने गाठले आहे. त्यातून काही लोक बरेदेखील झाले, परंतु हे संक्रमण रोखले नाही तर आरोग्य यंत्रणा तुटपुंजी पडते. तसेच आर्थिक तानालादेखील कुटुंबांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन सरकार मार्फत जर मोफत लसीकरण मोहीम राबविली जात असेल तर त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांनी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे वेळ न दवडता जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लोकांनी लस घेणे क्रमप्राप्त आहे, तरच कोरोना महामारी आपण रोखू शकू.
आपल्या देशामध्ये कोरना रुग्णांचे आकडे कमी झाले असले तरी गाफील राहून चालणार नाही. इतर देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. संक्रमणामुळे मुळे होणारा आजार केव्हाही डोके वर काढू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. -डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
प्रशासनाने आता वॉर्डनिहाय लसीकरण मोहीम राबवायला हवी. यासाठी सामाजिक संघटना प्रशासनासोबत राहतील. जी काही गरज लागेल ती संघटना करेल. एकाच ठिकाणी लसीकरण असल्यामुळे लोक लसीकरणाला जाणे टाळत असल्याचे पुढे येत असल्यामुळे प्रशासनाने वॉर्डनिहाय लसीकरण करून घ्यायला हवे.- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष- संकल्प इंजिनिअरिंग आणि सामाजिक संघटना
लस घेण्याचे हे आहेत फायदे..
- शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याने अनेक आजारांपासून बचाव
- कोरोनाचा धोका कमी होतो
- कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होते
- संसर्ग झाला तरी त्याची दाहकता वाढत नाही
- अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल करावे लागते. त्याचे प्रमाण कमी होते
- आर्थिक नुकसान टळते
- कुटुंबीयांना होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास कमी होतो
- देश, विदेशातील पर्यटनाला लसीकरण गरजेचे आहे