सातारा: जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच असून, बुधवारी आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ३९९ झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी रात्री ३५४ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कोडोली, (ता. सातारा) येथील ६९ वर्षीय पुरुष, मसूर, (ता. कऱ्हाड) येथील ६५ वर्षीय महिला, सोनर्डी, (ता. जावली) येथील ७० वर्षीय पुरुष, गजानन हौसिंग सोसायटी कऱ्हाड येथील ३५ वर्षीय महिला, म्हासोली, (ता. कऱ्हाड) येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कऱ्हाड येथील ६९ वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील ७८ वर्षीय पुरुष, वाई येथील ६७ वर्षीय महिला, बेलमाची, (ता. वाई) येथील ८३ वर्षीय महिला, कातर खटाव, (ता. खटाव( येथील ६८ वर्षीय पुरुष, जैतापूर, (ता. सातारा) येथील ६८ वर्षीय पुरुष, होबळवाडी, (ता. वाळवा) येथील ६० वर्षीय रुग्ण, कळंबवाडी, (ता. वाळवा) येथील ५५ वर्षीय पुरुष, वाळवा येथील १०० वर्षीय व ३८ वर्षीय पुरुष, विद्यानगर, (ता. कराड) येथील ४१ वर्षीय महिला, मोरावळे, (ता. जावली) येथील ५४ वर्षीय पुरुष, राऊतवाडी, (ता. वाई) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्तीचा वेगही आता झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत ३४ हजार ११३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.