सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तसेच मृतांची संख्याही कमी होत आहे. मंगळवारी नवीन २२ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींच्या संख्या १२७३ झाली.जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता कमी-कमी होत चालली आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार ३१२ जणांचे अहवाल बाधित आले आहेत. तर मंगळवारी दुपारपर्यंत नवीन २२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, माण, खटाव, पाटण, कोरेगाव आणि जावळी तालुक्यात नवीन रुग्ण आढळले. इतर जिल्ह्यातीलही काहीजणांची साताऱ्यात बाधित म्हणून नोंद झाली आहे.मंगळवारी दुपारपर्यंत नवीन २२ बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात खटाव तालुक्यातील पुसेगावमधील ८० वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील सोनगाव येथील ५२ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील शिवथर येथील ४९ वर्षांचा पुरुष, कळंबेतील ६० वर्षांचा वृध्द, देगावमधील ७० वर्षांची महिला यांचा मृत्यू झाला. तसेच येनके (ता. कऱ्हाड ) येथील ८० वर्षीय वृध्द, पाटण तालुक्यातील खराडवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष, अंबळेमधील ७० वर्षीय वृध्द यांचाही कोरोनाने बळी गेला आहे.जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील ८० वर्षीय पुरुष, राजापूरमधील ७० वर्षांची महिला, कऱ्हाड तालुक्यातील कोडोली येथील ७६ वर्षीय पुरुष, कऱ्हाडमधील ६० वर्षांची वृध्दा तसेच वरकुटे मलवडी (ता. माण) येथील ७७ वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील ८३ वर्षांचा वृध्द, कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, धनगरवाडी (ता. सातारा) येथील ९१ वर्षांचा वृध्द यांचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयात केंजळ (ता. वाई) येथील ५४ वर्षीय महिला, कण्हेरखेड येथील ५५ वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगीतील ६३ वर्षीय पुरुष, वडूजमधील ६९ वर्षीय वृध्द, सोनगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, सांगली जिल्ह्यातील ७० वर्षीय वृध्द असे मिळून २२ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.