सातारा: एकापाठोपाठ दोन गाड्या पळवून कऱ्हाड, पाटण रस्त्यावर थरार माजवणारी विदेशी तरुणी पावलीन जेस्सी ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले असून, तिच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, पावलीनला न्यायालयात ने आण करण्यासाठी बंदोबस्तामध्ये तैनात असणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनाही विलीनीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.पाटण येथून पावलीनने दुचाकी चोरली होती. या गुन्ह्यामध्ये पाटण पोलिसांनी तिला अटक केली होती. तिला वैद्यकीय तपासणीसाठी मंगळवारी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. जेस्सीला न्यायालयात ने-आण करणारे महिला पोलीस व इतर कर्मचारी हादरून गेले. जेस्सी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना पाटण येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.पावलीनला दुचाकी चोरी प्रकरणांमध्ये १९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पावलीन नेदरलँडची रहिवासी असून, गेल्या वर्षभरापासून ती महाराष्ट्रमध्ये वास्तव्य करत आहे. रविवारी तिने पाटणमधून एक दुचाकी चोरली होती. स्वतः जवळील पैसे संपल्याने पुण्यातील फ्लाईट पकडण्यासाठी तिने ही चोरी केली असल्याचे पावलीनने पोलिसांना सांगितले होते.
corona virus : गाड्या पळवणारी विदेशी तरुणी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:40 PM
CoronaVirus, Police, Sataranews, Karad, एकापाठोपाठ दोन गाड्या पळवून कऱ्हाड, पाटण रस्त्यावर थरार माजवणारी विदेशी तरुणी पावलीन जेस्सी ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले असून, तिच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, पावलीनला न्यायालयात ने आण करण्यासाठी बंदोबस्तामध्ये तैनात असणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनाही विलीनीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देगाड्या पळवणारी विदेशी तरुणी कोरोना पॉझिटिव्ह संपर्कात आलेले पाच पोलीस कर्मचारीही विलगीकरण कक्षात