सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी नव्याने १८६ रुग्ण आढळले. आतापर्यंतचा हा एका दिवसांतील सर्वाधिक आकडा ठरला असून, बाधितांचा आकडा ३,५२४ वर पोहोचला. तर मंगळवारी आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ११९ वर गेली आहे. दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्या ६७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता १८६५ झाली आहे.जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित स्वरुपात होती. पण, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोनाचा कहर झाला. त्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येऊ लागले. जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार १३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार कोरोना बाधित १३५ रुग्ण तालुकानिहाय असे आहेत. सातारा तालुक्यात सर्वाधिक २४ रुग्ण निष्पन्न झाले. यामध्ये सातारा शहरातील सदर बझारमध्ये १३, प्रतापगंज पेठ १, बुधवार पेठ २, करंजे खैरमली १ असे हे रुग्ण आहेत. तर तालुक्यात वर्ये येथे १, सैदापूर आणि पाटखळला प्रत्येकी १ आणि कण्हेरला २ रुग्ण आढळले. तसेच खटाव तालुक्यातही नवीन २३ रुग्ण स्पष्ट झाले. यामध्ये वडूज शहरात १३, विसापूर ७ आणि बनपुरी, पाचवड व निढळला प्रत्येकी १ रुग्ण बाधित सापडला.कºहाड तालुक्यातही नव्याने २१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कऱ्हाड शहरातील रविवार पेठेत १, मंगळवार पेठ १, शनिवार पेठेत २ तसेच शहरातील इतर दोघांचा यामध्ये समावेश आहे. तर आगाशिवनगरला २, मलकापूर ५, कालवडे येथे २, वडगाव हवेलीला १, येळगावमध्ये २ आणि कोर्टी व शिवडे येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. खंडाळा तालुक्यातही नवीन २१ रुग्ण आढळले. यामध्ये जवळे ४, पाडेगाव ४, विंग ८. तर शिरवळमधील बालाजी विश्व आणि स्टार सिटीमध्ये प्रत्येकी १ तसेच पळशी, खंडाळा आणि लोणंदमध्येही प्रत्येकी १ रुग्ण निष्पन्न झाला.पाटण तालुक्यात कासरुंडला ३, निगडे ३, जाधववाडी चाफळ २, चाफळ ३, नेरले ७, मल्हारपेठ आणि खाले प्रत्येकी १ अशाप्रकारे २० रुग्ण नव्याने स्पष्ट झाले. त्याचबरोबर वाई तालुक्यात १५ रुग्ण आढळले. यामध्ये पसरणी ४, काझी कॉलनी वाई २, वाई १, बोरगाव १, रेणावळे १, सिद्धांतवाडी १, माऊलीनगर १ तसेच सोनगिरवाडी १, रविवार पेठ, फुलेनगर आणि शहाबागमध्येही प्रत्येकी १ रुग्ण आढळला.
जावळी तालुक्यात सायगाव येथे ४ आणि पुनवडीला १ असे नवे ५ रुग्ण निष्पन्न झाले. महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर शहरात आणि गोडवली पाचगणी येथे प्रत्येकी १ असे ऐकूण २ रुग्ण वाढले. फलटण तालुक्यातही कोळकी आणि राजाळेत प्रत्येकी १ रुग्ण आढळला. तर कोरेगाव तालुक्यात सासुरणे येथील एकजण कोरोना बाधित निघाला.कोरेगाव, खंडाळा, वाई, साताऱ्यातील मृत...कोरोना बाधित आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील ७६ वर्षीय पुरुष आणि लोणंद, ता. खंडाळा येथील ६५ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातच वाई तालुक्यातील परखंदीचा ७२ वर्षांचा पुरुष आणि कुस बुद्रुक, ता. सातारा येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
सातारा तालुक्यातील सोनगाव (क्षेत्रमाहुली) येथील ६२ वर्षांच्या वृद्धेचाही साताऱ्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. खासगी प्रयोगशाळेत या वृद्धेचा अहवाल कोरोना बाधित म्हणून आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.