सातारा: जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून, मृत्यू होण्याचेही प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. गुरुवारी आणखी १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे मृतांची संख्या तब्बल ४४३ वर पोहोचली आहे. तसेच बाधितांचा आकडा १५ हजार ९६० इतका झाला आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्री आत्तापर्यंत एका दिवसातील उच्चांकी ७१३ रुग्ण बाधित आढळून आले. यात १३ बाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील आवर्डे येथील ५२ वर्षीय महिला, खटाव येथील ६५ वर्षीय पुरुष, कोंडवे, ता. सातारा येथील ६० वर्षीय पुरुष, शिवाजी नगर खंडाळा येथील ७५ वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी, ता. वाई येथील ४७ वर्षीय पुरुष, चिंचळी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मायणी, ता. खटाव येथील ४२ वर्षीय पुरुष, औंध, ता. खटाव येथील ५७ वर्षीय महिला, कटापूर, ता. कोरेगाव येथील ५७ वर्षीय पुरुष, उचिले, ता. खटाव येथील ५० वर्षीय पुरुष, संभाजीनगर, सातारा येथील ५४ वर्षीय पुरुष, राहोळी, ता. वाई येथील ७५ वर्षीय पुरुष, मलकापूर, ता. कऱ्हाड येथील ६७ वर्षीय महिलेचाही समावेश आहे.