सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची आणि बळींची संख्या दिवसागणिक वाढतच असून, गुरुवारी आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा आता २७७ तर बाधितांचा ८६७१ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्री ३९६ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये सर्वाधिक सातारा आणि कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एकट्या सातारा शहर आणि तालुक्यात १११ रुग्ण तर कऱ्हाड तालुक्यात १२२ रुग्णांचा समावेश आहे. इतर तालुकानिहाय आकडेवारी अशी पाटण २०, खटाव १६, फलटण ४०, माण ३२, कोरेगाव ६ आणि वाई तालुक्यात १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.सातारा, कऱ्हाडसह कोरेगावातील मृतजिल्ह्यात गुरुवारी आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये चौधरवाडी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, सासपडे, ता. सातारा येथील ६७ वर्षीय महिला, सदर बझार, सातारा येथील ७४ वर्षीय पुरुष, भाकरवाडी, ता. सातारा येथील ८२ वर्षीय पुरुष तसेच गजवडी, ता. सातारा येथील ६३ वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील ७३ वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ येथील ३५ वर्षीय पुरुष, बनवडी, ता. कऱ्हाड येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.