सायगाव : पुनवडी १६२ कोरोनाबधितापैकी ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अजून गावातील ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्वदी पार केलेल्या आजोबांनी जिद्दीने कोरोनाची लढाई जिंकली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.याबाबत माहिती अशी की, जावळी तालुक्यातील पुनवडी य येथील शनिवार, दि. १८ त्यांची ही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. आणि त्यात ते बाधित आले. त्यामुळे घरात रडारड सुरू झाली. आजोबांना मधुमेहाचा त्रास आहे. शिवाय कानानं ऐकायलाही कमी येते.
विशेष म्हणजे नव्वदि पार केलेल्या आजोबांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. पण आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आजोबांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. कोरोनाची लढाई जिंकून आल्याबद्दल आजोबांचे त्यांच्या नातेवाईकांनी ही टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.पुनवडी येथे कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन हतबल झाले होते.नंतर प्रशासनाने येथील कोरोना साखळी खंडित करण्यासाठी गावातील सर्वच ग्रामस्थांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याचे काम आख्या गावाची तपासणी झाली होती.
यामध्ये आतापर्यंत गावातील कोरोनाबाधित संख्या १६२ वर जाऊन पोचली होती. मात्र आता गेल्या तीन दिवसांत या गावात एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. मात्र दिलासादायक बातमी म्हणजे गावातील १६२ पैकी ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर संस्थात्मक विलगिकरणासाठी उपचार घेत असलेले ५० रुग्ण ही लवकरच निगेटिव्ह होऊन गावात परत यावेत व गाव परत पूर्वस्थितीत यावा अशी मनोकामना पुनवडीचे ग्रामस्थ करत आहेत.रुग्णवाहिकेचा आवाज आला की धस्सपुनवडी गाव गेली महिनाभर कोरोनामूळे चर्चेत आलेले आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे गावकरी ऐन सुगीच्या दिवसांमध्ये घरात लॉकडाऊन आहेत. गावात रुग्णवाहिकेचा आवाज आला की लोकांच्या काळजात धस्स होतंय. मात्र आता येणारी रुग्णवाहिका कोरोनामुक्त ग्रामस्थाला घेऊन येत असल्यामुळे नागरिकांमध्ये सद्या आनंदी वातावरण आहे.