सातारा : प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे गटप्रवर्तक म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना तुटपुंजे मानधन मिळत आहे. त्या शासनाच्या अधिकृत कर्मचारी नसताना त्यांना अतिरिक्त जबाबदारी दिली जाते; त्याचा निषेध म्हणून गटप्रर्वतकांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. जून महिन्यातील जीआरनुसार गटप्रवर्तकांना ३ हजार मानधन फरकासह लागू करावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन गटप्रवर्तकांनी सातारा पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे.चिंचणेर वंदन, कण्हेर, नागठाणे, नांदगाव, लिंब, कुमठे, परळी, ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रवर्तकांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेली दहा वर्षे अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करत आहोत. शासनाने मानधन वाढवण्याऐवजी मानधन कपात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तर सन २०२०-२०२१ च्या कृती आराखड्यात दैनंदिन फिरती भत्ता मंजूर करत आमच्यावर अन्यायच केला आहे.कोरोना रिर्पोटिंग व सुपरव्हिजनसाठी गटप्रवर्तकांना महिना ५०० रुपये म्हणजे दिवसाला फक्त १६ रुपये भत्ता देवून आर्थिक कुंचबणा केली जात आहे. या कामासाठी दैनंदिन ५०० रुपये भत्ता दिला पाहिजे. जून महिन्यातील जीआरनुसार गटप्रवर्तकांना ३ हजार रुपये मानधन फरकासह लागू करावे, आॅनलाईन काम करताना देण्यात येणारा २५० रुपये भत्ता बंद केलाय तो सुरु करावा, मोबाईल भत्ता फक्त १५० रुपये देण्यात तो ५०० रुपये करावा, अशा मागण्या करण्यात आला असून आम्ही शासनाचे नियमित सेवक नाही, कामावर आधारित मोबादला शासन देत असल्याने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या कामाची जबाबदारी गटप्रवर्तकांना देवू नका, अशीही मागणी केली आहे.या निवेदनावर सातारा तालुक्यातील गटप्रवर्तक दीपाली फडतरे, सुषमा चव्हाण, वैशाली भोसले, सुजाता जाधव, संगिता कदम, सरिता बोराडे, रेखा क्षीरसागर, चित्रा झिरपे, सुमन महाडिक, स्वाती कुंभार, विजया माने, सुनिता फाळके, वषारार्णी वाघ, कांचन कणसे, रेश्मा पवार, श्वेतांबरी जगताप, कविता किर्तीकर यांच्या स्वाक्षरी आहेत.
corona virus : गटप्रवर्तकांचा माझे कुटुंब मोहिमेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 4:34 PM
प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे गटप्रवर्तक म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना तुटपुंजे मानधन मिळत आहे. त्या शासनाच्या अधिकृत कर्मचारी नसताना त्यांना अतिरिक्त जबाबदारी दिली जाते; त्याचा निषेध म्हणून गटप्रर्वतकांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. जून महिन्यातील जीआरनुसार गटप्रवर्तकांना ३ हजार मानधन फरकासह लागू करावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन गटप्रवर्तकांनी सातारा पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे.
ठळक मुद्देतुटपुंजे मानधन, भत्ते, अतिरिक्त जबाबदाऱ्यामानधन वाढवण्याची मागणी