शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

corona virus : झेडपीमधील कोरोना बाधित कर्मचारी संख्या ७०० पार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 12:44 PM

Coronavirus, zp, satara, hospital सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून बाधित आकडा ७१२ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १३ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६३३ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देझेडपीमधील कोरोना बाधित कर्मचारी संख्या ७०० पार... आणखी एकाचा मृत्यू : आतापर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी

सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून बाधित आकडा ७१२ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १३ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६३३ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य आदी विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ७१२ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सातारा तालुक्यात कार्यरत १३३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाड मध्ये ११३, कोरेगाव ११३, खटाव ६३, खंडाळा ३२, जावळी २७, पाटण ७८, फलटण ४४, महाबळेश्वर ३३, माण २८ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्यां ४८ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आणखी एका कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा १३ वर पोहोचला आहे.आतापर्यंत पाटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी तिघां कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर सातारा व फलटण तालुक्यात कार्यरत प्रत्येकी २ आणि कोरेगाव तालुक्याचा एकाचा मृत्यू झाला. तसेच जावळी तालुक्यात आणखी एका कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेल्याने मृतांची संख्या दोनवर गेली आहे.कोरोनावर ६३३ जणांची मात...जिल्हा परिषदेच्या ७१२ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ६३३ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १०० जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १२४, पाटण ६८, कऱ्हाड  १०८, महाबळेश्वर ३३, खटाव ४६, वाई ४३, फलटण ३४, खंडाळा २९, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलzpजिल्हा परिषद