सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्यात यामुळे बळींचा आकडा आता शंभरी पार झाला आहे. आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या २ हजार ८५२ झाली आहे.जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार ९२ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे नायगाव, ता. कोरेगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील ७६ वर्षीय महिला व मंजुवडी, ता. फलटण येथील ६० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी रात्री ९२ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये ८ तालुक्यांतील रुग्णांचा समावेश आहे. सातारा तालुक्यात सर्वाधिक २८ रुग्ण आढळून आले आहेत. माण १, पाटण २, कोरेगाव ११, कºहाड ७, फलटण ११, खंडाळा ६ तर वाई २५ जणांचा समावेश आहे.
corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:58 PM
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्यात यामुळे बळींचा आकडा आता शंभरी पार झाला आहे. आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या २ हजार ८५२ झाली आहे.
ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा शंभरी पारआणखी तिघांचा मृत्यू; सातारा तालुक्यात सर्वाधिक बाधित