शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

corona virus : कोरोना बाधितांचा आकडा सहा हजार पार, नवीन २६१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 4:02 PM

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढू लागलाय. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार नवीन २६१ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ६२०० झाला. तर दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोरोना बाधितांचा आकडा सहा हजार पार, नवीन २६१ रुग्ण आणखी १२ जणांचा मृत्यू; दिवसभरात ५३ जण कोरोनामुक्त

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढू लागलाय. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार नवीन २६१ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ६२०० झाला. तर दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत १९२ लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, मंगळवारी ५३ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत २८०६ नागरिक बरे झाले आहेत.जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जुलै महिन्यापासून बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे काही दिवसांतच रुग्ण संख्येने ६ हजारांचाही टप्पा ओलांडला. तर सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार १७४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.या बाधितांमध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक ६९ रुग्ण आढळून आले. कऱ्हाड शहराबरोबरच सैदापूर, चोरे, वडगाव हवेली, कोळे, कोपर्डे हवेली, काले, मलकापूर, आगाशिवनगर, गोटे, आटके, उंब्रज, हणबरवाडी, बनवडी, ओंढ, कार्वे आदी गावांत हे नवे रुग्ण निष्पन्न झाले. सातारा तालुक्यातही नवीन ३५ रुग्ण आढळले. शहराबरोबरच कोडोली, नागठाणे, गोडोली, जकातवाडी, वाढे आदी ठिकाणचे हे रुग्ण आहेत.खंडाळा तालुक्यातील रुग्णसंख्येतही वाढ होऊ लागली आहे. सोमवारी रात्रीच्या अहवालानंतर तालुक्यात आणखी १९ रुग्ण वाढल्याचे समोर आले. खंडाळा, लोणंद, शिरवळ आदी गावांतील हे रुग्ण आहेत. खटाव तालुक्यातही वडूज, पळसगाव, पुसेगाव, पळशी येथे रुग्ण सापडले. कोरेगाव तालुक्यात हिवरे, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार किरोलीत नवे रुग्ण निष्पन्न झाले. फलटण तालुक्यात कोळकी, मिरडे, फलटण शहरात रुग्ण आढळले. तर तालुक्यात नवीन ८ रुग्णांची वाढ झाली आहे.

महाबळेश्वर शहराबरोबरच तालुक्यातील गोडवली, गोगवे येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पाटणला शहराबरोबरच वजरोशी, गारवडे आदी ठिकाणी नवीन रुग्ण दिसून आले. माण तालुक्यात म्हसवडला, वाईमध्ये सह्याद्रीनगरला आणि जावळी तालुक्यात नवीन २ रुग्ण आढळून आले. दरम्यान, मंगळवारी ६६३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सातारा तालुक्यातील चौघांचा मृत्यूकोरोना बाधित १२ जणांचा मंगळवारी दिवसभरात मृत्यू झाला. यामध्ये सातारा तालुक्यातील ४, कऱ्हाडतालुक्यातील ३, फलटण आणि पाटणमधील प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. तसेच खटाव तालुक्यातीलही एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान, कऱ्हाडतालुक्यातील काले येथील ३० आणि चोरेमधील ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर साताऱ्यातील शनिवार पेठमधील ७३ वर्षीय पुरुष आणि सोनापूर, ता. सातारा येथील ९२ वर्षांच्या वृध्देचाही मृत्यू झाला. फलटण येथील ५६ वर्षांचा पुरुष आणि ७० वर्षीय वृध्देचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कऱ्हाडमधील शनिवार पेठेतील ६८ वर्षांच्या कोरोना बाधित वृध्देचा साताऱ्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, सायंकाळी उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालयात पाटण तालुक्यातील सांगूर येथील ४० वर्षीय पुरूष. वडगाव, ता. खटाव येथील ७१ वर्षांच्या वृध्दाचा मृत्यू झाला. तर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात सातारा शहरातील व्यंकटपुरा पेठेमधील ४८ आणि जकातवाडी, ता. सातारा येथील ७४ वर्षांच्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली.रहिमतपूर ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू...रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या ४८ वर्षीय हवालदाराचा कोरोनामुळे सोमवारी रात्री मृत्यू झाला. साताऱ्यातील शाहूपुरी येथे ते राहत होते. पोलीस दलात त्यांनी सुमारे २५ वर्षे सेवा केली होती. इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी गेल्या महिन्यांमध्ये ते रजेवर गेले होते. उपचार सुरू असतानाच तपासणी दरम्यान त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर