सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी आणखी १९ जण कोरोना बाधित आढळून आले तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा ६१८ वर पोहोचला असून आत्तापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. विशेषत: पुणे-मुंबईहून आलेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन अक्षरश: हतबल झाले आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. शनिवारी आणखी १९ जण कोरोना बाधित आढळून आले. त्यामध्ये कºहाड, फलटण आणि खंडाळा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. तर खटाव तालुक्यातील वडगाव येथील ७५ वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा कºहाडमधील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा आता २६ झाला आहे.कोरोना बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी अशी : फलटण तालुका- (१३) होळ येथील ७, तांबवे येथील ६, कºहाड तालुका- तुळसण येथील- ५, खंडाळा तालुका- शिरवळ १ अशा १९ जणांमध्ये ११ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे.
CoronaVirus : साताकरांची चिंता वाढली, कोरोना बाधितांचा ६०० चा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 2:33 PM
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी आणखी १९ जण कोरोना बाधित आढळून आले तर एका कोरोना बाधिताचा ...
ठळक मुद्देसाताकरांची चिंता वाढली; कोरोना बाधितांचा ६०० चा टप्पा पारएका कोरोना बाधिताचा मृत्यू ; बळींची संख्या २६ वर