शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

corona virus Satara : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; उच्चांकी ९२२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:13 PM

CoronaVirus Satara- सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून गत चोवीस तासात उच्चांकी नवे ९२२ रुग्ण आढळून आले असून यामध्ये पाच जणांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ९३६ वर पोचला आहे तर बाधितांची संख्या ७० हजार १३७ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; उच्चांकी ९२२ नवे रुग्ण आणखी पाच जणांचा मृत्यू; बाधितांची संख्या ७० हजारावर

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून गत चोवीस तासात उच्चांकी नवे ९२२ रुग्ण आढळून आले असून यामध्ये पाच जणांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ९३६ वर पोचला आहे तर बाधितांची संख्या ७० हजार १३७ इतकी झाली आहे.जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. विशेषता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोज तीनशेच्यावर बाधितांचे येणारे आकडे आता नऊशे च्यावर जाऊ लागले आहेत. त्याच बरोबर रुग्ण दगावण्याचे प्रमाणनही सातत्याने वाढत आहे.गत चोवीस तासात बुधवारी आलेल्या ९२२ जणांचा अहवालामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील ५० वर्षीय पुरुष, फलटण येथील ४५ वर्षीय महिला, कोरेगाव, येथील ५० वर्षीय पुरुष, शेनोली, ता. कराड येथील ७० वर्षीय पुरुष, धावडवाडी, ता. आटपाडी जिल्हा सांगली येथील ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ७० हजार १३७ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा १ हजार ९३६ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ६१ हजार ९४८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या ६ हजार २५३ रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर