सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून गत चोवीस तासात नवे ६५९ रुग्ण आढळून आले असून यामध्ये तब्बल नऊ जणांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ९४५ वर पोचला आहे तर बाधितांची संख्या ७० हजार ७९६ इतकी झाली आहे.जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. विशेषता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोज तीनशेच्यावर बाधितांचे येणारे आकडे आता नऊशे च्यावर जाऊ लागले आहेत. त्याच बरोबर रुग्ण दगावण्याचे प्रमाणनही सातत्याने वाढत आहे.गत चोवीस तासात गुरुवारी आलेल्या ६५९ जणांचा अहवालामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हामदाबाद, ता. सातारा येथील ६५ वर्षीय महिला, गांजे, ता. जावळी येथील ७० वर्षीय पुरुष, साताऱ्यातील मंगळवार पेठ मधील एकूण ८९ वर्षीय महिला, नांदोशी, ता. खटाव येथील ६३ वर्षीय पुरुष, साताऱ्यातील गडकर आळी मधील ७६ वर्षीय पुरुष, आंबवडे, ता. सातारा येथील ६५ वर्षीय महिला, वाई येथील ८२ वर्षीय पुरुष, साताऱ्यातील करंजे पेठेमधील ७८ वर्षीय पुरुष, खेड तालुका सातारा येथील ४७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ७० हजार ७९६ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा १ हजार ९४५ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ६२ हजार २४२ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या ६ हजार ६०९ रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
corona virus Satara Updates : जिल्ह्यात चोवीस तासात नऊ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 2:31 PM
corona virus Satara Updates :
ठळक मुद्देजिल्ह्यात चोवीस तासात नऊ जणांचा मृत्यू नवे ६५९ रुग्ण; बळींची संख्या १९४५ वर