सातारा : जिल्हा परिषदेत कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली असून याचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढत चालला आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. याचा एक भाग म्हणजे सातारा जिल्हा परिषदेत कोरोना वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.
या कोरोना वॉर रूमचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
फोटो दि.२६सातारा हेल्थ नावाने...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेतील कोरोना वॉर रूमचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.
.................................................