कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला असताना त्याला रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळेच कोरोनाला काबूत आणणे शक्य झाले. अशा कोरोना योद्ध्यांचा वेळे ( ता. वाई ) येथे आर.पी.आय. डेमोक्रेटिक पक्षाचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष व वेळे गावचे सुपुत्र विधात अशोक सोनावणे यांनी सत्कार केला.
कोरोनाला रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न झाले. त्याचप्रमाणे गावातील काही होतकरू तरुण व समाजसेवक यांनी मिळून प्रसंगी आपले प्राण संकटात टाकून झुंज दिली. त्यांना अनेक संकटे आडवी आली; परंतु जनहिताच्या कामात त्यांनी संकटांवर मात करून हा लढा यशस्वी केला. त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल घेणे गरजेचे असून, त्यांना योग्य ती शाबासकी मिळावी, यासाठीच हा सन्मान करण्यात आला, असे प्रतिपादन आयोजक विधात सोनावणे यांनी केले.
भुईंज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कांबळे साहेब, भंडारी, किर्दत तसेच डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका, सफाई कर्मचारी, पत्रकार, समाजसेवक आदींचा सत्कार करून त्यांना मानचिन्ह देण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी सामाजिक संदेश दिला.
सोबत फोटो:
वेळे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान करताना विधात सोनावणे व इतर.