गत ५४ वर्षांपासून कवठे येथे महाशिवरात्रीनिमित्त भेदिक शाहिरी संमेलन आयोजित करून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील भेदिक शाहिरांना निमंत्रित केले जाते. त्याद्वारे भेदिक कलेला प्रोत्साहन देण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी प्रथमच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे संमेलन रद्द करण्यात आले आहे. अखंड चाललेली परंपराच कोरोना महामारीमुळे खंडित झाली आहे. यादिवशी कृष्णा नदीतिरी असलेल्या महादेव मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम शासनाचे नियम पाळून होणार असल्याने भाविकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन डी. जी. कळसकर यांनी केले आहे. हा निर्णय भेदिक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी निवृत्ती नांगरे, अशोक काशीद, नानासाहेब कुंभार, तानाजी कुंभार, जगन्नाथ कुंभार, गुरुदास कळसकर, दिलीप माने, सुनील वायदंडे, सुभाष कुंभार, चंद्रकांत काशीद, माणिकराव सुतार, विष्णुपंत गायकवाड, भूषण सुतार, आनंदराव कळसकर, रामचंद्र शिंदे, अरुण सुतार, अधिक पुजारी आदी उपस्थित होते.
कवठेतील भेदिक शाहिरी संमेलन कोरोनामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:37 AM