सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच आहे. चोवीस तासांत तब्बल ३८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच उच्चांकी नवे १५४३ रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढती संख्या पाहून जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.
जिल्ह्यात जितक्या गतीने कोरोना बाधितांची संख्या वाढतेय तितक्याच गतीने आता मृतांचे प्रमाणही वाढत आहे. गत चोवीस तासांत आलेल्या नव्या १५४३ जणांच्या अहवालामध्ये तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये भुईंज, ता. वाई येथील ३८ वर्षीय महिला, चांदक, ता. वाई येथील ६५ वर्षीय पुरुष, भरतगाव, ता. सातारा येथील ६८ वर्षीय पुरुष, नागाचे कुमटे, ता. खटाव येथील ४२ वर्षीय पुरुष, खटाव, ता. खटाव येथील ६५ वर्षीय पुरुष, सदरबजार, ता. सातारा येथील ८० वर्षीय पुरुष, बापुदासनगर, ता. फलटण येथील ७० वर्षीय पुरुष, रणदुल्लानगर, ता. कोरेगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, काळचौंडी, ता. माण येथील ६० वर्षीय महिला, चिखली, ता. कराड येथील ५३ वर्षीय महिला, मलकापूर, ता. कराड येथील ७० वर्षीय पुरुष, अभ्याचीवाडी, ता. कराड येथील ४६ वर्षीय पुरुष, घारेवाडी, ता. सातारा येथील ५५ वर्षीय महिला, शनिवार पेठ, ता. कराड येथील ५५ वर्षीय महिला, भोळी, ता. खंडाळा येथील ६४ वर्षीय पुरुष, तामीणी, ता. पाटण येथील ४८ वर्षीय पुरुष, गोळेश्वर, ता. कराड येथील ३२ वर्षीय पुरुष, रसाटी, ता. पाटण येथील ७२ वर्षीय पुरुष, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर येथील ६० वर्षीय पुरुष, कोडवली, ता. फलटण येथील ७६ वर्षीय पुरुष, लिंगमळा, ता. महाबळेश्वर येथील ७० वर्षीय पुरुष, कर्वेनगर, ता. जि. पुणे येथील ६१ वर्षीय पुरुष, नागठाणे, ता. सातारा येथील ६८ वर्षीय पुरुष, खोजेवाडी, ता. सातारा येथील ७३ वर्षीय महिला, लिंब, ता. सातारा येथील ७० वर्षीय महिला, लडेगाव ता. खटाव येथील ७६ वर्षीय पुरुष, सैदापूर, ता. कराड येथील ७२ वर्षीय पुरुष, सातारा येथील ५९ वर्षीय पुरुष, भोसे, ता. कोरेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, खटाव, ता. खटाव येथील ७९ वर्षीय पुरुष, पुसेसावळी, ता. खटाव येथील ६५ वर्षीय महिला, विरवडे, ता. माण येथील ३३ वर्षीय पुरुष, खावली, ता. वाई येथील ६० वर्षीय पुरुष, बोरगाव, ता. वाई येथील ६५ वर्षीय महिला, धर्मपुरी, ता. वाई येथील ६५ वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील ५१ वर्षीय पुरुष, जावळी, ता. जावळी येथील ५१ वर्षीय पुरुष, ओंड, ता. कराड येथील ७० वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ८० हजार ३९३ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा २ हजार ८१ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ६६ हजार १२६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या १२ हजार १८६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
चौकट : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २४.०१ वर
जिह्यात कोरोना बाधितांची भयावह स्थिती झाली आहे. दररोज नवनवा विक्रम होऊ लागला आहे. काल रात्री आलेल्या अहवालात गेल्या चोवीस तासात ६४२४ जणांचे स्वॅब तपासले होते. त्यापैकी १५४३ जण पॉझिटिव्ह आले असून २४.०१ टक्क्यांवर पॉझिटिव्हीटी रेट पोहोचला आहे.