कोपर्डे हवेली : मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाबरोबर गावातील अनेक घटक काम करूनसुद्धा कमी जास्त प्रमाणात बाधित रुग्ण सापडत असल्याने कोपर्डे हवेली गावात चिंतेचे वातावरण दिसत आहे.
आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, महसूल खाते, कोविड योद्धा ग्रुप, ग्रामपंचायत आदींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. चाचण्यांची संख्या वाढली; परंतु अपेक्षेइतके यश मिळाले नाही. गावातील दररोजची रुग्णांची परिस्थिती काय आहे. यासाठी कोविड योद्धा ग्रुपच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेण्यात येतो. गेल्या महिन्यात गावाचे सुपुत्र असणारे डाॅक्टरांनी कोरोनाविषयी मार्गदर्शन केले. अनेक उपाय करूनही कोरोनाबाधित रुग्ण कमी जास्त प्रमाणात सापडत आहेत. सध्या १९ रुग्ण सक्रिय आहेत.
कोट....
आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण ग्रामस्थांनी स्वत:ची काळजी स्वत: घेतली पाहिजे. गर्दी टाळून मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्स राखले पाहिजे.
-किशोर साळवे, कोविड योद्धा ग्रुप, कोपर्डे हवेली
चौकट...
मार्चपासून कोरोना बाधित एकूण-२२३...
बरे झालेले-२१३...
मृत्यू -१०...
सक्रिय-१९.