मलटण : मलटण हे फलटणचे महत्त्वाचे उपनगर आजपर्यंत कोरोनासारख्या संकटाला मलटण व परिसरातील नागरिकांनी वेशीवरच रोखून धरले होते. परंतु, शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून मलटण कोरोनाने नवे केंद्र बनत आहे.
आजपर्यंत अनेक रुग्ण कोरोनाबाधित झाले आणि ते उपचारांनंतर बरेही झाले. मात्र, शुक्रवारी गेल्या वर्षभरातील उच्चांकी आकडा समोर येत आहे. मलटणमध्ये तब्बल २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी पाहता नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने घालून दिलेली नियमावली नागरिकांनी तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांना त्यांच्या कामात सहकार्य करून या संकटातून मार्ग काढणे आवश्यक आहे.
तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. किराणा दुकाने दवाखाने, भाजी दुकाने या ठिकाणी गर्दी होताना दिसते. मलटणमधील वाढते कोरोना रुग्ण पाहता प्रशासनाने येथे आणखी कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती घराबाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.