सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा रुद्रावतार सुरूच असून, बुधवारी जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी गेला तर १५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच २०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, त्यामध्ये मृत्यू पावलेल्या तीन कोरोना संशयितांचाही समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता २४ वर पोहोचला असून, बाधितांची संख्या ५७१ झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फलटण तालुक्यातील कोळकी येथील मुुंबईवरून प्रवास करून आलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तसेच तीनजणांच्या मृत्यू पश्चात अहवालाबरोबरच २०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामध्ये वाई तालुक्यातील भोगाव येथील ८५ वर्षीय महिला, गिरवी, ता. फलटण येथील ६५ वर्षीय महिला तसेच वेळेकामथी, ता. सातारा येथील ५९ वर्षीय पुरुषाचा त्यामध्ये समावेश आहे.
नवे १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून, तालुकानिहाय आकडेवारी अशी, सातारा (२)- वावदरे, ४५ वर्षीय महिला माणगाव-अतीत ३५ वर्षीय पुरुष, कोरेगाव-(३) कठापूर ६२ वर्षीय पुरुष, २४ व ५५ वर्षीय महिला, जावळी- (३) वाहगाव ३४ वर्षीय पुरुष, काटवली २९ वर्षीय पुरुष व ५६ वर्षीय महिला, पाटण-(३) जांभेकरवाडी दोन वर्षीय बालक, दिवशी मारुली २९ वर्षीय पुरुष, नवसरी ५५ वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा-(१) शिरवळ ५५ वर्षीय महिला, माण-(१) दहिवडी १९ वर्षीय युवक, कऱ्हाड (१) तुळसण ६२ वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण-(१) कोळकी ५४ वर्षीय सारी आजाराचा पुरुष अशा १५ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या दिवड, ता. माण येथील २९ वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला असून, सध्या या महिलेवर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत ५७१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. त्यामुळे सध्या ३२४ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.