सातारा : कोरोनाच्या हाहाकाराने शनिवारी सकाळी जिल्हा अक्षरश: हादरून गेला. एकाच दिवसात तब्बल ४० जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात बळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा २४१ झाला आहे.पुणे-मुंबईहून प्रवास करून आलेल्या नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. यापूर्वी एका दिवसांत वीसजण कोरोना बाधित आढळून आले होते. मात्र, शनिवारी एका दिवसात रेकॉर्डब्रेक ४० जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हा हादरून गेला. सातारा, माण, कऱ्हाड , पाटण, कोरेगाव, फलटण, खंडाळा आणि वाई तालुक्यातील हे ४० नवे कोरोना बाधित रुग्ण आहेत.माण तालुक्यातील लोधवडे येथील एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला. मुंबई येथून आलेला कऱ्हाड तालुक्यातील बाचोली येथील ४७ वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील ५८ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी, ता. पाटण येथील २७ वर्षीय पुरुष, तसेच २० वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला भुलेकरवाडी, ता. पाटण येथील ६० वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली होलेवाडी, ता. कोरेगाव येथील ४० वर्षीय महिला, शिरताव, ता. माण येथील २५ वर्षीय पुरुष, शिरताव, ता. माण येथील २८ वर्षीय पुरुष, कोळकी, ता. फलटण येथील निकट सहवासित ३४ व ६० वर्षीय महिला, ९ वर्षाचे दोन बालके, जकातवाडी, ता. सातारा येथील २७ वर्षीय पुरुष, शाहुपूरी, ता. सातारा येथील २९ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिला, धनवडेवाडी, ता. सातारा येथील निकट सहावासित ३६ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय महिला, घारदरे, ता. खंडाळा येथील ५१ वर्षीय पुरुष, येळेवाडी, ता. खंडाळा येथील ७० वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली, ता. वाई येथील ४७ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे, ता. कोरेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील ४४ वर्षीय महिला व ५५ वर्षीय पुरुष, म्हासोली, ता. कऱ्हाड येथील ३७ वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित २६ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, १० व ८ वर्षाचे बालक, ४६ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय युवक, ४४ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय युवक, १९ वर्षीय युवक, ५२ वर्षीय महिला, असे एकूण ४० जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.दरम्यान, एकीकडे चाळीसजण पॉझिटिव्ह आढळून आले असले तरी दुसरीकडे एकाच दिवसांत २२६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाला थोडाकाहोईना दिलासा मिळाला.जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा २४१ झाला असून, कोरोना मुक्त होऊन ११३ जण घरी गेले आहेत तर सहाजणांचा बळी गेला आहे. सध्या १२२ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.साताऱ्यातील शाहूपुरीत कोरोनाचा शिरकाव..|गत दोन महिने कोरोनापासून दूर असलेल्या साताऱ्यातील शाहूपुरी परिसरात शनिवारी कोरोनाने एन्ट्री केली. २९ वर्षीय युवक आणि ५२ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे शाहूपुरीत खळबळ उडाली. ज्या ठिकाणी हे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्या ठिकाणी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना राबवून परिसर सील केला आहे.