शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

CoronaVirus : महामारीच्या प्रादुर्भावात विम्याचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 1:48 PM

कोरोना महामारीशी राज्यातील २७ हजार ५०० सरपंच ताकदीने सामना करत आहेत. राज्य शासनाने सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच लागू केल्याने सरपंचांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील १४०० सरपंचांना या विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

ठळक मुद्देमहामारीच्या प्रादुर्भावात विम्याचा आधार!सरपंचांना दिलासा : सातारा जिल्ह्यातील १४०० सरपंचांना लाभ

सातारा : कोरोना महामारीशी राज्यातील २७ हजार ५०० सरपंच ताकदीने सामना करत आहेत. राज्य शासनाने सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच लागू केल्याने सरपंचांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील १४०० सरपंचांना या विम्याचे संरक्षण मिळाले आहे.कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये गावपातळीवर ग्रामसमित्या स्थापन केल्या आहेत. शासनाने दिलेल्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवणे. परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना नियमांची अंमलबजावणी करत विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे काम ग्रामसमित्या करत आहेत. त्यामुळे ग्रामसमितीचे अध्यक्ष असणारे सरपंच यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे लोक त्यांच्या थेट संपर्कात येत असतात. यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.या मागणीची दखल सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल मागणी केली. या विमा कवचाचा फायदा राज्यातील २७५०० सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचांचा ५० लाखांचा विमा या माध्यमातून निघणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, संगणक आॅपरेटर, नर्सेस यांना देखील शासनाने प्रत्येकी २५ लाखांचे विमा कवच दिले असल्याने त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना महामारीशी लढत असताना सरपंचांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.

गावाबाहेरून आलेल्या लोकांशी त्यांचा निकटचा संपर्क येत होता. जिल्ह्यात जे कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ९० टक्के लोक हे मुंबई, ठाणे, पुणे येथून प्रवास करून आलेले लोक आहेत. त्यामुळे सरपंचांना कोरोनाची व्याधी होण्याची शक्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर विमा कवच मिळाल्याने सरपंचांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोनाच्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. सरपंच परिषदेच्या मागणीला शासनाने प्रतिसाद दिला आहे.-जितेंद्र भोसले, खजिनदार, सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर