शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 5:55 PM

सातारा जिल्ह्यात एकूण १,६७९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई करून ११ दुकानदारांचे परवाने रद्द केले. ६ दुकानदारांचे परवाने निलंबित केले तर ३ दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाईजिल्हा पुरवठा कार्यालयाकडे विविध तक्रारीं

सातारा : सातारा जिल्ह्यात एकूण १,६७९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई करून ११ दुकानदारांचे परवाने रद्द केले. ६ दुकानदारांचे परवाने निलंबित केले तर ३ दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे.

६ दुकानदारांकडून धान्याच्या गैरव्यवहाराची बाजारभावाने भरपाई वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उर्वरित काही दुकानदारांना गैरप्रकारांबाबत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.यामध्ये लाभार्थ्यांना विहित परिणामापेक्षा कमी धान्य देणे, जादा दर आकारणे, काही दुकानदारांनी ग्राहक यादीमध्ये नाव असतानाही धान्य देण्यास नकार दिला आहे. अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील आॅनलाईन नोंद असणाऱ्या व्यक्ती संख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण केल्याची प्रकरणेही पुढे आलेली आहेत.

तसेच विक्री साठा लेखी प्रत्यक्ष विक्री केलेल्या धान्याशी न जुळणे, दर्शनी भागात भावफलक व प्राप्त धान्य माहिती न लावणे, उद्धट वर्तणूक करणे, ग्राहक रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, लाभार्थ्यांना पावत्या न देणे आदीबाबत पुरवठा विभागाकडील भरारी पथकामार्फत तपासणीच्यावेळी गैरप्रकार निर्दशनास आले आहेत.

संवेदनशीलपणे व जबाबदारीने काम न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर यापुढेही कार्यवाही सुरूच राहणार आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर