शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

CoronaVirus Lockdown : चार दिवसांपासून कुटुंब राहत होते मृतदेहासोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 1:22 PM

कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील म्हातेखुर्द येथे दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या एका युवकाचा राहत्या घरात तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या मृदेहाबरोबरच अख्ख कुटूंब आपले दैनंदिन काम घरात राहूनच करीत होते.

ठळक मुद्देचार दिवसांपासून कुटुंब राहत होते मृतदेहासोबतम्हातेखुर्द येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ : दुर्गंधीमुळे घटना उघडकीस

सायगाव :कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील म्हातेखुर्द येथे दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या एका युवकाचा राहत्या घरात तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या मृदेहाबरोबरच अख्ख कुटूंब आपले दैनंदिन काम घरात राहूनच करीत होते.

तीन दिवसानंतर घरातून तीव्र स्वरूपाची दुर्गंधी बाहेर येत असल्याने संबंधित युवकाच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. आर्यन जयवंत दळवी ( वय १५ ) असे या युवकाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जावळी तालुक्यांमध्ये खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन जयवंत दळवी (रा. म्हाते खुर्द) याचा ४ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. एका दुर्धर आजाराने तो त्रस्त होता. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे आर्यनच्या कुटुंबीयांना उपचारासाठी आर्यनला कुठेच नेता आले नाही.

या आजारानेच त्याचा जीव घेतला. मात्र आता शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ही बाब समोर येणार आहे. तोपर्यंत जावळी तालुक्यातल्या परिसरातील नागरिकांमध्ये सध्यातरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झालेला असताना देखील घरात त्याच पद्धतीने सतत असणारा मृतदेह पडून मृतदेहावर किडे देखील पडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतदेहाची दुगंर्धी संपूर्ण परिसरात होऊ लागल्याने गावातच यासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान पोलिस प्रशासनाला यासंदर्भात गावातल्याच काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

घटनास्थळावर तत्काळ पोलीस आणि प्रशासन पोहोचल्यानंतर घरात तीन दिवसांपूर्वीच सडलेला त्या युवकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी दिली. मात्र वडिलांनी कोणालाही न सांगता घरातच बॉडी ठेवली, त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

म्हाते येथे युवकाचा आढळलेला मृतदेह २४ तासापेक्षा जास्त ७२ तासापर्यंत झालेला असावा. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यात जंतू झाले होते. २४ तासांपूर्वी मृत्यू झाल्याने नियमानुसार कोरोनाची टेस्ट घेता येत नाही. त्यामुळे सातारा ऐवजी मेढयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला.डॉ. भगवानराव मोहीते. तालुका आरोग्य अधिकारी पं.स. जावळी . 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर