शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

water shortage : सातारा जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:29 PM

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरूटंचाईला प्रारंभ : चार तालुक्यांत सहा टँकर; गतवर्षी १८९

सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. सुरुवातीला मान्सूनचा, त्यानंतर परतीचा तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. म्हणजे एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली आहे.दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते; पण आता एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर सुरू झालेत. जिल्ह्यात सुरुवातीला खटाव तालुक्यात १४ एप्रिलला टँकर सुरू झाला. गारवडी (आवळे पठार) येथे हा टँकर सुरू झाला आहे. यावर १४९ ग्रामस्थ आणि १०५ पशुधन अवलंबून आहे. यानंतर पाटण, वाई आणि माण तालुक्यात टँकर सुरू झाले.माण तालुक्यातील एक गाव आणि पाच वाड्यांसाठी एक टँकर सुरू आहे. यावर एक हजार लोक अवलंबून आहेत. हा टँकर मलवडी सर्कलमधील वारुगडसाठी सुरू झाला आहे. वाई तालुक्यातही मांढरदेवसाठी एक टँकर सुरू करण्यात आला आहे.

यावर १ हजार ४५५ ग्रामस्थ आणि ४५३ पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी, अंब्रुळकरवाडी (भोसगाव) व चव्हाणवाडी (नाणेगाव), शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी वरची या गावांसाठी टँकर सुरू करण्यात आला आहे. पाटणमध्ये दान गावे चार वाड्यांसाठी तीन टँकर आहेत. यावर २ हजार ३०२ ग्रामस्थ आणि १ हजार ७४ पशुधन अवलंबून आहे.जिल्ह्यात सध्या ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झाले आहेत. यावर ४ हजार ८६१ ग्रामस्थ आणि १ हजार ६३२ पशुधन अवलंबून आहेत. आगामी काळात टँकरची संख्या वाढणार आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.गतवर्षी तीन लाख लोकांना पाणीपुरवठा२०१८ मध्ये पाऊस कमी झाला होता. त्यामुळे २०१९ मध्ये टंचाईची स्थिती तीव्र होती. दुष्काळामुळे गावोगावी पाणीपुरवठा करावा लागत होता. यामधून एकही तालुका सुटलेला नव्हता. गतवर्षी २१ एप्रिलला जिल्ह्यात १८९ टँकर सुरू होते.

यामाध्यमातून १६० गावे आणि ७३३ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. तर ३ लाख ३ हजार नागरिक आणि १ लाख १५ हजार पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी सर्वाधित गावे आणि लोकसंख्या ही माण तालुक्यात होती. गतवर्षी २१ एप्रिल रोजी माणमध्ये ९५ टँकर सुरू होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर