सातारा : जिल्ह्यात बुधवारपासून मद्य विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर शहरातील मद्य विक्री दुकानांसमोर पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. संपूर्ण दिवस या दुकानांपुढे ही रांग पाहायला मिळाली. दुपारी सूर्य आग ओकत असल्याने दुकानांसमोर सावलीसाठी मंडप टाकण्यात आले होते.गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री बंद होती. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी रेड झोनमधील मद्यविक्री दुकाने सुरू करायला परवानगी दिली होती. तरी देखील सातारा जिल्हा प्रशासनाने मात्र मद्यविक्रीवरील बंदी उठवली नव्हती. त्यामुळे मद्यपींच्या नजरा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे लागल्या होत्या. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्री सुरू करण्याचा आदेश काढला.बुधवारपासून सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी दिली. ही बातमी कळताच मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. बुधवारी पहाटे चार वाजल्यापासूनच शहरातील मद्यविक्री करणाºया दुकानांसमोर मद्यपींनी गर्दी केली. कधी एकदा दुकान उघडतेय अन् मद्य मिळतेय, याचीच ते वाट पाहत होते. राज्य उत्पादन शुल्कने शहरातील प्रत्येक दुकानासमोर अधिकारी व कर्मचाºयांचा फौजफाटा नेमला आहे. त्यांच्या देखरेखीत मद्यविक्री सुरू करण्यात आली.दरम्यान, दुकानदार मागेल तेवढे मद्य देत नसल्याने अनेक मद्यपी वेगवेगळ्या दुकानांवर जाऊन मद्य खरेदी करून ते घरामध्ये साठवून ठेवत असल्याचे चित्रही बुधवारी शहरात पाहायला मिळाले.
CoronaVirus Lockdown : भल्या पहाटेपासून वाइॅन शॉप पुढे रांगा, दुकानांसमोर मंडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 5:44 PM
सातारा जिल्ह्यात बुधवारपासून मद्य विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर शहरातील मद्य विक्री दुकानांसमोर पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. संपूर्ण दिवस या दुकानांपुढे ही रांग पाहायला मिळाली. दुपारी सूर्य आग ओकत असल्याने दुकानांसमोर सावलीसाठी मंडप टाकण्यात आले होते.
ठळक मुद्देभल्या पहाटेपासून वाइॅन शॉप पुढे रांगा, दुकानांसमोर मंडप मद्यपी उन्हाची तमा विसरले; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पहारा