सागर गुजरसातारा : कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपरात्री काही महाभाग घुसखोरी करून घरी जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. या परिस्थितीत स्थानिक जनतेने अधिक दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे.चेकनाक्यावर पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून काही महाभागांनी घुसखोरी केलेली आहे.स्थानिक प्रशासन संबंधितांना होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून घरात बसण्याच्या सूचना करत असले तरी यापैकी अनेकजण होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून घेत नाहीत. होम क्वॉरंटाईनचा शिक्का असूनदेखील अनेकजण बेकायदा फिरत आहेत.
हेच लोक स्थानिक लोकांशी वाद देखील घालत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले तर आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची काळजी जिल्हा प्रशासनाला लागून राहिलेली आहे.
प्रशासनाच्या मंजुरीशिवाय कुणालाही सातारा जिल्ह्याकडे पाठवू नये, अशा सूचना मुंबई व पुणे येथील प्रशासनाला केलेल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यातून आलेले लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. आता लोकांचा लोंढा वाढत असताना या सर्वांची कोरोना तपासणी करणं अशक्य असल्यानं बाधित वाटताहेत त्यांची तपासणी केली जात आहे.-शेखर सिंह,जिल्हाधिकारी, सातारा
जिल्हा प्रशासनापुढील अडचणी मुंबई-पुण्यामध्ये ज्या भागात कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर झाली आहे, त्या ठिकाणच्या सातारकरांना गावाकडे परतायचे आहे; परंतु प्रतिबंधित क्षेत्रामधून कुणालाही बाहेर सोडले जात नाही. आता असे लोक चोरीछुपे रात्री-अपरात्री जिल्ह्यात एन्ट्री करतायेत.