शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Coronavirus: कोरोनाच्या सावटामुळे पालीची यात्रा साधेपणाने साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 8:43 PM

Coronavirus: येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल ता.कराड येथे तारळी नदीकाठी  गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांच्या मूर्तीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.

उंब्रज -येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल ता.कराड येथे तारळी नदीकाठी  गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांच्या मूर्तीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.एरवी भंडार्यात न्हाहून निघाणारी पालनगरी यंदा भंडार्या विना सुनीसुनी दिसत होती.दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे पारंपारिक व साध्या पद्धतीने ओपन फुलांनी सजवलेल्या जीप मधून सोबत शिवाजी बुवांचा मानाच्या गाड्यासह देवाचे मानकरी व सेवेकरी यांनी यावर्षी मिरवणूक काढली.

आज विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत पालनगरीत येणारे सर्व रस्ते बंद करून बाहेरून येणाऱ्या कोणासही प्रवेश दिला नाही. यात्रेच्या अनुषंगाने पाल नगरीत दि.१४ ते १९ पर्यंत व दि.२३ रोजी देवस्थान ट्रस्ट व पाल गावातील मानकरी सोडुन इतर गावातील, जिल्ह्यातील,इतर राज्यातील भाविकांना दर्शनास मनाई करण्याचे आदेश पारीत करण्यात आले होते.तसेच मंदिर परिसरातील ५ किलोमीटर अंतरावरून नागरिकांना आत येण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता.

दुपारी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या घराजवळ गावातील मोजकेच मानकरी उपस्थित होते.त्यानंतर मानकरी देवराज पाटील यांचा चिरंजीव तेजराज पाटील यांनी ग्रामप्रदक्षिणा घालत दुपारी खंडोबा मंदिरात आले. यावेळी तेजराज पाटील यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाच्या गाड्यात देवास बसवून अंधार दरवाजापर्यंत देवाची मिरवणूक काढण्यात आली.अंधार दरवाजाजवळ मिरवणूक आल्यानंतर तेजराज पाटील हे पोटास बांधलेल्या श्री खंडोबा व म्हाळसा या देवतांच्या मुखवट्यासह फुलांनी सजवलेल्या ओपन जीप या वाहनात ४.३० वाजता विराजमान झाले.

त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी 'येळकोट येळकोट...जय मल्हार, सदानंदाचा येळकोट..'चा गजर भंडारा खोबर्याची उधळन केली.या मिरवणुकीत गावातील सासनकाठ्या, मानाचा  गाडा, फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या. देवालयातून निघालेली मिरवणूक तारळी नदीत उभारण्यात आलेल्या भराव पुलावरून वाळवंटातून नदीच्या पश्चिमेकडील तीरावर पोहोचली.यावेळी मोजक्याच भाविकांनी भंडारा, खोबऱ्याची उधळण करण्यास सुरूवात केली. मानकरी देवाचे मुखवटे बरोबर घेवून जीपमधून विवाह समारंभासाठी ठराविक वऱ्हाडी मंडळीसमवेत विवाह मंडपाकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास मिरवणूक विवाह मंडपात पोहोचली. मानकऱ्यांनी देवास बोहल्यावर चढविल्यानंतर पारंपारिक पध्दतीने सायंकाळी ५.४० या गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसाचा विवाह सोहळा विधीवत पार पडला. यावेळी पुन्हा-पुन्हा 'येळकोट..येळकोट'च्या जयघोषात करण्यात आला.

कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे तारळी नदी पात्रात दरवर्षी खचाखच भरणारी यात्रा वाळवंटात मोकळी दिसून येत होती.यात्रा शांततेत व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व उंब्रज पोलीस ठाणे आणि आरोग्य विभाग सतर्क राहिला होता. यात्रा काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रणजीत पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचे सपोनि अजय गोरड यांनी १० पोलिस अधिकारी,७९ पोलिस कर्मचारी तसेच स्वयंस्फूर्तीने होमगार्ड बंदोबस्तात सहभागी झाले होते.यावेळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सभापती प्रणव ताटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर