सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ४ मे रोजी रात्री उशिरा ८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यापैकी २ जणांचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे (सारी) मृत्यू झाला असून, संशयित म्हणून त्यांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित ६ जणांच्या घशातील नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २७, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील २, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील ३२ असे एकूण ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.
CoronaVirus : साताऱ्यात २ रुग्णांचा सारीने मृत्यू, ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ६ जण दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:02 PM