सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला. तर एकाचा मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. दरम्यान, १७७ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.फलटण तालुक्यातील होळ येथील ८४ वर्षीय महिला व तांबवे येथील ९४ वर्षीय पुरुषाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या मृत दोन कोरोना संशयितांच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या दोघांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, हे समोर येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.दरम्यान, जावळी तालुक्यातील केळघर (तेटली) येथील मुंबई वरून आलेल्या व्यक्तीचा २६ मे रोजी मृत्यू झाला होता, या व्यक्तीचा मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा आता १६ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ४५३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी १३४ रुग्ण बरे होऊन घरी गेल आहेत. तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३०३ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
CoronaVirus : जिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 1:41 PM
: जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला. तर एकाचा मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. दरम्यान, १७७ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यूएकजण मृत्यूपश्चात बाधित; मृतांचा आकडा १६ वर