शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

नगरसेवक शिंदे महाबळेश्वरातून तडीपार

By admin | Published: October 27, 2015 10:21 PM

पोलीस अधीक्षकांचे आदेश : दहशत पसरविणाऱ्या सात टोळ्यांमधील चौदा जणांना ‘चले जाव’

सातारा : मुख्याध्यापकांना मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेल्या महाबळेश्वरमधील नगरसेवक कुमार गोरखनाथ शिंदे आणि योगेश गोरखनाथ शिंदे या बंधूंना महाबळेश्वर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या दोघांसह जिल्ह्यात दहशत पसरविणाऱ्या विविध सात टोळ्यांतील १४ जणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमधून तडीपार केल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.महाबळेश्वर परिसरात चोरी, गर्दी-मारामारी, अपहरण, आदेशाचा भंग, जबरी चोरी, घरात घुसून मारहाण, तोडफोड, सरकारी नोकरावर हल्ला असे गंभीर गुन्हे शिंदे बंधूंवर दाखल आहेत. महाबळेश्वर पालिकेची शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक संजय ओंबळे आणि शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक जनार्दन कदम या दोघांना मारहाण करून शहरातून धिंड काढल्याप्रकरणी शिंदे बंधूंवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जूनमध्ये घडलेल्या या घटनेत दोघा मुख्याध्यापकांचे कपडे फाडून तोंडाला काळे फासण्यात आले होते. नगरपालिकेच्या बाहेरही या दोघांना मारहाण झाली होती. तत्पूर्वी शाळेत घुसून मुलांचे मोबाइल फोडण्याचा प्रकारही घडला होता. शिंदे बंधूंना तालुक्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव महाबळेश्वरच्या पोलीस निरीक्षकांनी अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठविला होता. मुख्याध्यापकांना मारहाण प्रकरणाची चित्रफीत अधीक्षकांनी सुनावणीदरम्यान शिंदे बंधूंना दाखविली आणि चित्रफितीत दिसणारे आपणच आहोत हे शिंदे बंधूंनी मान्य केले होते. या प्रकरणासह विविध गुन्ह्यांतील सहभागाबद्दल दोघांना महाबळेश्वर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.दरम्यान, कऱ्हाड तालुक्यात चोरी, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, चोरीची तयारी, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी यासारखे गुन्हे करून दहशत पसरविल्याप्रकरणी सलीम ताजुद्दिन मुल्ला (वय २२) आणि सतीश शिवाजी माने (वय ३५, दोघे रा. म्हासोली) या दोघांना हद्दपार करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. हे दोघे कऱ्हाड, पाटण, कडेगाव, वाळवा, शिराळा या पाच तालुक्यांच्या हद्दीत सहा महिने प्रवेश करू शकणार नाहीत.घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या सागर संजय शिंदे (वय २०, रा. कापील, ता. कऱ्हाड) आणि अविनाश भीमराव सकट (वय २३, रा. बेघरवस्ती, गोळेश्वर, ता. कऱ्हाड) या दोघांना सातारा व सांगली जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. कऱ्हाड शहर हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेले अभिजित जगन्नाथ मुळीक (वय २५, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) आणि सनी ऊर्फ गणेश सुनील शिंदे (वय २२, रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड) यांना गंभीर दुखापत करणे, मारामारी, आदेशाचा भंग, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याने कऱ्हाड तालुका हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार व इतर गुन्हे दाखल असलेले समीर सलीम कच्छी (वय ३५, रा. सैदापूर, ता. सातारा), पोपट आनंदा माने (वय ५८, रा. कोडोली, मूळ रा. आरफळ, ता. सातारा) यासीन इकबाल शेख (वय ३३), सचिन सुरेश मोरे (वय ३२, दोघे रा. शनिवार पेठ, सातारा) या चौघांना सातारा तालुका हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देऊनही वर्तनात सुधारणा न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. महिला, मुले, विद्यार्थी, शेतकरी, व्यापाऱ्यांना उपद्रव होत असल्याच्या तक्रारींवरून या सर्वांवर तडीपारीचे प्रस्ताव दाखल झाले होते. सुनावणीअंती अधीक्षकांनी हा निर्णय घेतला असून, आदेशापासून ४८ तासांत या सर्वांनी नेमून दिलेल्या हद्दीबाहेर जायचे आहे. (प्रतिनिधी) तंटामुक्ती अध्यक्षाचा समावेशतडीपारीचा हुकूम बजावण्यात आलेल्यांमध्ये चक्क एका तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाचा समावेश आहे. सोमनाथ रमेश चव्हाण (वय २४) असे त्याचे नाव असून, तो कालगावचा (ता. कऱ्हाड) रहिवासी आहे. याच गावच्या मयूर महादेव साळुंखे (वय २५) यालाही सहा महिन्यांसाठी कऱ्हाड तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.