सातारा : ‘अघोरी तत्त्वज्ञान राबविणाºयांच्या हातात देशाची व राज्याची सूत्रे गेली आहेत. सांप्रदायिक विचारांना खतपाणी घालण्याचे काम सध्या काही लोकांकडून केले जात आहे. तथाकथित गोरक्षकांची संख्या वाढली असून, गायीच्या रक्षणाच्या नावाखाली लोकांवर हल्ले केले जात आहेत. महिला, दलितांवरही अत्याचार केले जात आहेत. या सांप्रदायिक विचारांविरोधात संघर्ष करण्याची सर्वांनी तयारी ठेवावी,’ असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी येथे केले.सांसदीय कामकाजाची ५० वर्षे पूर्ण केल्याच्या औचित्याने खासदार शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सत्कार सोहळा समिती व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने खासदार शरद पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मैदानावर सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्याला माजी केंद्रीय गृहमंत्री व काँगे्रसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार नरेंद्र पाटील, आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार लक्ष्मण माने, माजी खासदार निवेदिता माने, नगराध्यक्षा माधवी कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, अरुणादेवी पिसाळ, रयतचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सुधीर धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘मी सबइन्स्पेक्टर म्हणून काम करत होतो. शरद पवारांनी मला शोधून काढलं. शरदराव ही राजकीय जीवनाची चालती-बोलती शाळा आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीच्या काळात मी मंत्री होतो. त्याच काळात पुलोदचे विविध कडबोळ्याचे सरकार अस्तित्वात होते. त्याचे नेतृत्व शरद पवारांनी केले. त्याच काळात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या निर्णयावर शरद पवार ठाम राहिले. सामाजिक समतेचा विचार त्यांनी बारामतीतून सुरू केला. पुढे आयुष्यभर सांभाळला आहे.’माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शरद पवार हे परिश्रम करणारे नेते आहेत. १९९१ साली मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा पवार हे केंद्रात मंत्री होते. केंद्रात निर्णय झाला की ते तत्काळ महाराष्ट्रातील खासदार, आमदारांना त्याबाबत कल्पना देत असत. साहजिकच यामुळे महाराष्ट्राची प्रगती होत राहिली. दुष्काळी पट्ट्यातील बारामतीत त्यांनी नंदनवन तयार केले आहे. वय आकड्यात वाढते. त्यामुळे भविष्यातही अनेक वर्षे पवार काम करत राहतील.’पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘शरद पवार हे खºया अर्थाने देशाच्या राजकारणातील विक्रमादित्य आहेत. २२ व्या वर्षी काँगे्रस युवकचे अध्यक्ष, २७ व्या वर्षी आमदार आणि ३८ व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री ही जादू केवळ शरद पवार हेच करू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या युगपुरुषांमध्ये शरद पवारांचा समावेश होतो. मुंबईतल्या मिल कामगारांचे प्रश्न असोत, किल्लारी भूकंपावेळी केलेल्या उपाययोजना असोत अथवा १९९३ साली झालेला मुंबई बॉम्बस्फोट असो, या प्रत्येकवेळी शरद पवारांनी आपल्यातील नेतृत्वगुण आणि मुत्सद्देगिरी दाखवली आहे.’सत्कार सोहळ्याला भाजपच्या नेत्यांची पाठखासदार शरद पवार यांच्या सत्कार सोहळ्याकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरविली. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. माजी आमदार सदाशिव सपकाळ व पालिकेचे गटनेते धनंजय जांभळे वगळता जिल्हाध्यक्षांसह भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींनी या सोहळ्याकडे पाठ फिरविली.अन् गहिवरून आले‘मुघल, आदिलशहा यांच्याशी दोन हात करणाºया शिवछत्रपतींच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभे राहिलात. आता तुम्ही माझ्याही पाठीशी आहात, हे माझं भाग्य आहे,’ असे सातारा जिल्ह्यातील उपस्थित कार्यकर्त्यांना भाषणातून सांगत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरद पवारांना गहिवरून आले होते. -वृत्त/३ वर
अघोरी हातात देश, राज्याची सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:20 AM