शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Satara: चूक मुलाची; बेतली आई-वडिलांच्या जीवावर; सख्ख्या चुलत भावानेच भाऊ, भावजईचा केला निर्घृण खून

By दत्ता यादव | Published: October 09, 2023 1:54 PM

डोक्यात कुऱ्हाडीने केले वार 

सातारा : मुलाने केलेल्या अत्याचाराची घृणास्पद चूक आई-वडिलांच्या जीवावर बेतली. सख्ख्या चुलत भावानेच अत्याचाराचा बदला म्हणून भाऊ आणि भावजईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील आंधळी या गावात घडली.आंधळी, ता. माण येथील संजय रामचंद्र पवार (वय ४९) व मनीषा संजय पवार (वय ४५) या दाम्पत्याचा शनिवार, दि. ७ रोजी रात्री दहा वाजता निर्घृण खून करण्यात आला. हा खून सख्ख्या चुलत भावानेच केल्याचे तपासात उघड झाले असून, या घटनेनंतर आरोपीला दहिवडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (वय ३५, रा. आंधळी, ता. माण) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय पवार व मनीषा पवार हे दोघे शनिवारी रात्री दहा वाजता पवारदरा शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. संजय पवार हे चेंबर खोलून मोटार सुरू करत होते तर त्यांची पत्नी मनीषा या पिकाला खत टाकत होत्या. एवढ्यात मागून येऊन संजय यांचा सख्खा चुलत भाऊ दादासो पवार याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी मनीषा मदतीसाठी धावून आल्या. तेव्हा त्यांच्यावरही दादासो पवारने कुऱ्हाडीने घाव घातला. यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर दादासो पवार तेथून पसार झाला.सकाळी पवार दाम्पत्य घरी का आले नाही म्हणून शिवारात जाऊन काही लोकांनी पाहिले असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. पोलिस पाटील यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी शेडगे, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केल्यानंतर हा खून दादासो पवार याने केल्याचे पोलिसांना समजले. तो खून केल्यानंतर कारने पुण्याला गेला. तेथून पुन्हा फलटणमार्गे घरी येत असताना पोलिसांनी त्याला वाटेतच पकडले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कसलेही आडेवेडे न घेता खुनाची कबुलीही दिली. मृत संजय पवार यांच्या पश्चात आई, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी तसेच एक मुलगा आणि भाऊ आहे. दहिवडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

खुनाचे हे कारण...मृत पवार दाम्पत्य आणि चुलत भाऊ दादासो पवार यांचे अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. मृत संजय पवार यांच्या मुलाने एका तरुणीवर अत्याचार केला होता. या प्रकरणाचा राग अनेक दिवस दादासो पवारच्या डोक्यात होता. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी वारंवार तो धमकी देत होता. रात्री दोघे शेतात गेल्याची संधी साधून चुलत भाऊ आणि वहिनीचा त्याने खून केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस