शेंद्रे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, जनतेचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून वेचले, ता. सातारा येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य उपकेंद्र वेचले येथे कोविड-१९ लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.
पंचायत समिती सदस्या छाया कुंभार यांच्या हस्ते लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी लसीकरणाची पूर्ण माहिती घेतली व स्वतः लसीकरण करून घेतले. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. यावेळी नोडल ऑफिसर तथा विस्तार अधिकारी सोनल झोरे, सरपंच सुनीता सुतार, उपसरपंच भीमराव भोसले, ग्रामसेवक संजय यादव, ग्रा.पं. सदस्य विजय चव्हाण, अधिक काटकर, सिद्धार्थ जावळे, बेबी घोरपडे, सुधा गोडसे, सुवर्णा शिंदे, संगीता भिलारे, पोलीस पाटील राहुल गुजर, वैद्यकीय अधिकारी किरण पवार, आरोग्य सेविका मनीषा फाळके व आरोग्य सेवक किरण जाधव, आरोग्य सहायक अरविंद गोळे, अंगणवाडी सेविका कोमल माने, मनीषा निकम, आशा स्वयंसेविका पूनम खोत आदी उपस्थित होते.