कुडाळ : मेढा, ता. जावली येथील गांधीनगर येथील आदिवासी कातकरी व गोसावी समाजासाठी साताऱ्याच्या जीविका हेल्थ केअर सेंटरकडून कोरोना लसीकरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अमोल पवार, डॉ. भाग्यश्री आनंदे, डॉ. कुणाल राजमाने, रसिका पवार, गौरव जाधव, संजय सपकाळ, अशोक पवार, विशाल रेळेकर उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ म्हणाले, ‘ज्यांना आधारकार्ड नाही अशा लोकांच्या घरापर्यंत जाऊन लसीकरण होत आहे. कातकरी व गोसावी समाजाची उपजीविका मासेमारीवर होत असून तो समाज लसीकरणापासून वंचित होता.’
मुख्याधिकारी अमोल पवार, इर्शाद तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. विशाल रेळेकर यांनी सूत्रसंचलन केले. संजय सपकाळ यांनी आभार मानले.