सातारा : कोयनेत पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन फुटांनी उचलण्यात आले असून त्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर सकाळी बाराच्या सुमारास धरणातून २० हजार ५३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झालेला. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत गेली. परिणामी मंगळवारी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले.
फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पण, पाण्याची आवक होत असल्याने धरणात साठा वाढत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी पहाटेपासून धरणाचे दरवाजे दोन फुटापर्यंत वर उचलून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.