सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, केवळ तीन दिवसांत आठजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.संदीप जगन्नाथ लोंढे (वय ४२, रा. पाटखळ, ता. सातारा), रमेश भुजंग भोंडवे (वय ४०,रा. पाल, ता. कऱ्हाड ), लखन दिलीप काळभोर (वय २३, रा. पाल, ता. कऱ्हाड ), रमेश पुंडलिक निंबाळकर (वय ३३, रा. मंगळवार पेठ, सातारा), अक्षय बबन किर्तीकुडाव (वय २४, रा. कोडोली, ता. सातारा), विनायक मोहन शिखरे (वय २७, रा. अंगापूर वंदन, ता. सातारा), बशीर इब्राहिम शेख (वय ४५, रा. निगडी तर्फ, तारगाव, ता. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या संशयितांकडून देशी, विदेशी दारूचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत.सातारा तालुका, सातारा शहर, शाहूपुरी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाई केल्या आहेत. दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी फरार असलेला आरोपी रमेश श्रीरंग ननावरे (रा. वर्ये, ता. सातारा) याला अटक केली. रमेश ननावरे याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.
अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:12 PM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, केवळ तीन दिवसांत आठजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
ठळक मुद्देअवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाकाआठजण ताब्यात: २ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त