कराड : कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर मंगळवारी रात्री ठेकेदार असलेल्या डी पी जैन कंपनीच्या सुमारे ८५ टन वजन असणाऱ्या क्रेनच्या चाकात अडकून तुटली. त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार अशी समाजमाध्यमात चर्चा सुरू झाली.त्याचे पडसाद बुधवारी सकाळी उमटले. कराड मधील अज्ञात १५ ते २० तरुणांनी ठेकेदाराची क्रेन व २ पोकलँडच्या काचांची तोडफोड केली.तसेच टायर वरती डिझेल टाकून क्रेन पेटवून देण्याचाही प्रयत्न केला .पण पावसाच्या सरी कोसळत असल्याने क्रेन पेट घेऊ शकली नाही.पण यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याचे घटनास्थळावरुन समजते.दरम्यान घटनेची माहिती समजतात कराड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील व त्यांची टिम तेथे दाखल झाली आहे. त्यामुळे कराडचा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्यात तापला आहे.
Satara: पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची केबल वायर तुटली, कराडात अज्ञातांनी क्रेन, पोकलँडची तोडफोड केली
By प्रमोद सुकरे | Published: July 24, 2024 3:51 PM