कराड - कराड येथील लाहोटी कन्या शाळेची धोकादायक बनलेली संरक्षक भिंत रविवारी मुसळधार पावसामुळे दुपारच्या वेळी कोसळली. यामध्ये तब्बल सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कराड येथील लाहोटी कन्या प्रशाला परिसरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी १० व ११ जुलै रोजी भेट देत धोकादायक अवस्थेत आढळलेल्या इमारतींची पाहणीही केली होती. तसेच नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी लाहोटी कन्या प्रशालेत जाऊन मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांच्याशी परिसरातील धोकादायक इमारती व संरक्षक भिंतीच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. धोकादायक इमारतीच्या रस्त्यावरून शाळेत येणाऱ्या स्कूलबस न आणणेबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, शक्यतो मुलींनी या रस्त्याचा वापर टाळावा, अशा सूचना करण्याचे मुख्याध्यापिका बायस यांना नगराध्यक्षा शिंदे यांनी सांगितले होते.लाहोटी कन्या प्रशाला व पालिकेची शाळा क्रमांक नऊ या दोन शाळा असल्याने या परिसरात सकाळी व सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होते. रविवारी शाळेस सुटी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रशालेची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे संरक्षक भिंतीलगत लावलेल्या दुचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
कराडात भिंत कोसळून दुचाकी गाड्यांचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 3:43 PM
कन्या शाळा परिसरातील घटना : वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
ठळक मुद्देतब्बल सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.१० व ११ जुलै रोजी भेट देत धोकादायक अवस्थेत आढळलेल्या इमारतींची पाहणीही केली होती.